Home

|| श्री ज्ञानेश्वरांची आरती ||

आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
सेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ धृ॥

लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी,
अवतार पांडुरंग, नाम ठेवीले ज्ञानी ॥ १ ॥

आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
सेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ धृ॥

कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी,
नारद तुंबर हो, साम गायन करी ॥ २ ॥

आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
सेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ धृ॥

प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले,
रामा जनार्दनी, पायी मस्तक ठेविले ॥ ३ ॥

आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
सेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ धृ॥